जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी मराठी शाळेला कमी न लेखता,अभ्यास करुन शाळेचे नाव उज्वल करावे. तसेच शिक्षकांनीही प्रमाणिकपणे विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण द्यावे. आज (दि 15) या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असुन सर्वच विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे आणि खुप अभ्यास करुन जीवनात खुप मोठे व्हावे. तसेच पालकांनीही मुलांना दररोज शाळेत पाठवावे त्यामुळे गैरहजरचे प्रमाण कमी होऊन शाळेची गुणवत्ता वाढेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिरूर ग्रामीण येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राणी कर्डिले ह्या होत्या. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत आणि इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांना ओवाळत फुले आणि खाऊ देऊन त्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतुहल दिसत होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या मुलांना गणवेश तसेच पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे म्हणाले, आम्ही सर्व शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवून,खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करु. तसेच विद्यार्थी आमच्याकडून चांगले शिक्षण घेऊन घडतील याची आम्हाला खात्री असुन आम्ही अध्यापनात कुठेही कमी पडणार नाही. तसेच आम्ही सर्वजण शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु असे सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राधा रेपाळे, शीतल थोरवे तसेच अनेक महिला व पालक उपस्थित होते. तसेच दादाभाऊ वाघमारे, उर्मिला जगदाळे, उज्वला लाळगे, सुनीता टोणगे, अनिल जगदाळे, निता वाबळे हे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांनी तर आभार जयश्री मांजरे यांनी व्यक्त केले.