विठ्ठलवाडीतील पांडुरंग विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): रुबाबदार फेट्यांचा झोक… मिरवणूकीला ढोल ताशांची साथ… कुंकूम तिलकाने प्रेमाचे औक्षण… नवीन पुस्तके…गोड खाऊ आणि एक फुल झाड सुद्धा…!

हा थाट आहे नवागतांच्या स्वागताचा…!

विठ्ठलवाडी (ता.शिरूर ) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे असे जोरदार स्वागत केले. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाचा नुकताच आरंभ झाला प्रदिर्घ सुटीनंतर विद्यार्थ्यांची पाऊले पुन्हा आपल्या विद्यालयाकडे वळाली. आपल्या मित्र- मैत्रिणींची पुन्हा नव्याने भेट होणार ही आस होती. त्यातच इयत्ता पाचवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या बालचमूच्या मनात मात्र खास कुतुहल होते. यावेळी खास कार्यक्रम घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गवारी तसेच मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी नवागतांचे खास स्वागत केले.

प्रभाकर चांदगुडे, अरुण शिदे, बाळासाहेब गायकवाड, विशाल कुभार, प्रविण जगताप, संगीता गवारी, योगिता हरगुडे हे शिक्षक तर ज्योती कातोरे, सूर्यकांत लोले, नंदकुमार लोले, संजय गवारी, दिपक गवारी, अंकुश ढाले, दिलिप दौंडकर, संदिप गवारी इ पालक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक बाळासो गायकवाड यांनी केले होते.