काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियानात सहभागी व्हा; हरी शंकर गुप्ता

मुंबई: काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि काँग्रेसचा विचार, इतिहास, लोकशाही व संविधानवादी मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘प्रतिभा शोध’ (Talent Hunt) अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व स्तरांतील लोकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

अधिक वाचा..

शिरुर येथील राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) सर्वज्ञ पवार राज्यात पाचवा 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सर्वज्ञ राम पवार हा राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) 200 पैकी 192 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला वर्गशिक्षिका कांचन शिंदे, आई वैशाली पवार, वडील राम पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञच्या या यशाचे शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच आबासाहेब जगताप (सरचिटणीस […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी झाल्याने श्वान पथकाच्या सहाय्याने परिसराची कसून तपासणी

पोलीस निरीक्षकांच्या आईसह महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील कमळजाई नगर येथे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या घरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन पोलीस निरीक्षकाच्या आईसह शेजारील एका महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर […]

अधिक वाचा..