शिरुर येथील राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) सर्वज्ञ पवार राज्यात पाचवा 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सर्वज्ञ राम पवार हा राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) 200 पैकी 192 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला वर्गशिक्षिका कांचन शिंदे, आई वैशाली पवार, वडील राम पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्वज्ञच्या या यशाचे शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच आबासाहेब जगताप (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ)अहमदनगर, जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन संतोष गायकवाड, माजी चेअरमन शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, विद्यमान चेअरमन संदिपजी मोटे, प्रवीण ठुबे (शिक्षक नेते), चंद्रकांत रायकर, सतीश खोपकर, नानासाहेब धुमाळ, भालेराव, गणेश कोहकडे, नंदाकिनी पवार, ज्योती कोहकडे, सुवर्णा धुमाळ आदींनी अभिनंदन केले.