शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा म्हस्के- वाळुंज यांचे मार्गदर्शन मिळाले.

बाभुळसर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष धनी, सर्व शिक्षकवृंद, तांदळी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल घुमरे, बाभुळसर गावचे सरपंच गणेश मचाले, उपसरपंच सुनिल देशवंत, शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष नागवडे, उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, संजय मचाले व सर्व सदस्य यांनी वेदांतीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच शिंदोडी ग्रामस्थांनीही वेदांतीचे अभिनंदन करुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.