sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचे खरे कारण तीन वर्षांनी सांगितले आहे. डिंभे ते माणिकडोह या १६ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित बोगद्यावरून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे […]

अधिक वाचा..

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग सध्या वेगळे असले, तरी दोघांमधील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची […]

अधिक वाचा..

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी तसेच केंद्र सरकारविरोधातील काही मुद्द्यांवर राष्ट्रवादीची दिसून येणारी मवाळ भूमिका यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; पार्थ पवारांच्या शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याचा आक्षेप पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानुसार, २६ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

खडसेंच्या अमृत महोत्सवाला फडणवीस-शरद पवार एकाच व्यासपीठावर; महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार […]

अधिक वाचा..

शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल सुरू असून, पक्षाचे सर्व प्रवक्ते पदावरून हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच नव्या प्रवक्त्यांची घोषणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शशिकांत शिंदे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने युवक व विद्यार्थी संघटनांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी सुशील बोर्डे यांची नियुक्ती […]

अधिक वाचा..

भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका

अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]

अधिक वाचा..

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह ७ जण बिनविरोध.

नवी दिल्ली: देशातील १० राज्यांमधील रिक्त असलेल्या ३७ राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी २६ जागांवर उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित ११ जागांसाठी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये समझोता झाल्यामुळे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), विनोद तावडे (भाजप) […]

अधिक वाचा..

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची […]

अधिक वाचा..