शिरुर तालुक्यातील कंपनीत जाणाऱ्या कामगाराचे हातपाय बांधून लुटणारे जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवर रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून संतोष कोनिराम मोहिते, विकी शिवाजी जाधव व गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेत गैरव्यवहार

शालेय व्यवस्थापन समितीकडूनच पंचायत समितीकडे तक्रार शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक मिळवलेला तसेच आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत सदर शाळेचा उल्लेख केलेली शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता पहिलीतील तीनशे हून अधिक तर इतर वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तीन ते पाच हजार […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन काही रक्कम जप्त करुन शालिक प्रेमदास कुलकर्णी याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात अजिंक्यतारा हॉटेल शेजारी एका पत्र्याचे शेड मध्ये एक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंपनीत जाणाऱ्या कामगारांचे हातपाय बांधून लुटले…

रात्रीत दोन कामगारांना लुटल्याने कामगार भयभीत शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून दुचाकी मोबाईल सह आदी वस्तू लुटून अजूनही एका कामगाराला मारहाण करत लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या पोलीस चौकीवर मद्यपीकडून दगडफेक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकीवर मद्यपी व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाळासाहेब काशिनाथ साकोरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकी येथे पोलीस कर्मचारी काम करत असताना एक मद्यपी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात विद्युत रोहित्र व जुन्या तारा बदला

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथील विद्युत रोहित्र बदलून जुन्या तारा देखील बदलून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत निवेदन देऊन केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावठाण तसेच व्यापारी संकुल परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या पोलिसांना पोलिस पाटलांकडून गारवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन मध्ये सध्या उन्हाळ्यातून होणाऱ्या उकाड्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांकडून कुलर भेट देण्यात आल्याने शिक्रापूरच्या पोलिसांना पोलिस पाटलांकडून गारवा मिळाला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन मध्ये आज पोलीस पाटील यांची मिटिंग आयोजित करण्यात आलेली असताना काही पोलीस कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरांत पत्रा उचकटून पावणेदोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका पत्र्याच्या शेडचा पत्रा उचकटून टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मधील तब्बल 1 लाख 78 हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे सुरज धुमाळ यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑफिस असून चार […]

अधिक वाचा..

शिक्रापूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

तीन महिन्यात अकरा विनयभंग तर चार बलात्काराचे गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून 3 महिन्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनयभंगाचे 11 बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले असून या पीडितांमध्ये अल्पवयीन युवतींची संख्या जास्त असल्याने महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मारहाण करत युवकाचा मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून […]

अधिक वाचा..