nikita-hargude-sanaswadi

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिक्रापूरः सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निकिता हरगुडे या ६ ऑक्टोबर रोजी पुणे-नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या निकिता यांना दुचाकीची धडक बसली. निकिता या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढणार…

शिरुर (तेजस फडके) बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने त्या दृष्टीने अजित पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अजित पवार […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-ajit-pawar

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

शिरूर (तेजस फडके) : www.shirurtaluak.comच्या वतीने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या नावाने विशेषांक तयार करण्यात आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ४) प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. प्रदेश प्रवक्ता चंदन सोंडेकर हे शिरुर हवेली मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर www.shirurtaluak.com च्या […]

अधिक वाचा..
crime

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

शिरूर : दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झाले, यावेळी झालेल्या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील उसाच्या गरम रसात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला रसाच्या बाहेर काढल्यानंतर दवाखान्यात घेऊन जातो असे सांगण्यात आले, मात्र त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी नदीत फेकून त्याची हत्या करण्यात आली. मांडवगण फराटा येथे असलेल्या एका […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील खून प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते. या वादा नंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला होता. खुन करून फरार झालेल्या आरोपीस शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. ०१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याचा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : अण्णापुर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७) यांना ‘तुझा तर कार्यक्रम करतो, तु दारुबंदी कशी करतो तेच बघतो, तुझ्यावर बायकोला बोलावून अॅट्रॉसिटी दाखल करतो,’ अशी धमकी देत शिविगाळ केली आहे. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई दशरथ जगताप (रा. अण्णापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर […]

अधिक वाचा..
ramdas-thite-award

प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर ) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे यांचे वतीने आदर्श गुणवंत प्राचार्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, ग्रामीण परिसरात मुलींसाठी शिक्षणाची विशेष सुविधा, समावेशित शिक्षण, अध्ययन-अध्यापनात माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, […]

अधिक वाचा..
nitin-thorat-award

प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): आमदाबाद (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सुजाता नितीन थोरात यांना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २७-०९-२०२४ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच इतर […]

अधिक वाचा..
harshal-pingle-pabal

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यातील मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

शिक्रापूर : खेळता असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षांच्या चिमुकल्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घराच्या पत्र्यावर गेलेला चेंडू काढणे हर्षल पिंगळे (वय १२) या चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. पत्र्यावर गेलेला चेंडू काढताना त्याला […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूरच्या वतीने निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने महेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन […]

अधिक वाचा..