शिरूर तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवनजवळ असलेल्या एका किराणा दुकानासमोर शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शिक्षकाला धडक देऊन दुचाकीसह फरफटत नेले. त्यामध्ये दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जयसिंग बाबूराव येडलापुरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. संतोष सुखदेव लोखंडे (वय. ४४ रा. तळेगाव ढमढेरे, मुळगाव […]

अधिक वाचा..

शिरूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अपशब्द वापरून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. या प्रकरणी चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वैभव संतोष भोसले (वय 2४) रा. पवार मळा, शिरूर याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्‍यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. […]

अधिक वाचा..

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक 

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीतील कारेगाव हद्दीत प्लेटोर सोसायटीच्या समोर तु आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन एका १७ वर्षाच्या युवकास गंभीर जखमी केले होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी २४ तासांच्या आत सर्व आरोपीना अटक केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर नगर परिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र

थकीत मालमत्ता धारकांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा निर्णय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या नियमानुसार, मालमत्ता कर व पाणीपट्टी दरवर्षी १ एप्रिल रोजी भरावा लागतो. तसेच, पहिल्या सहा […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेचे संरक्षण कंपाऊंड वॉल तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथे उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (दि. २२) मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडला असून, याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, कचरा डेपो येथील कचऱ्याला […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणेः पुणे शहरासह पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्प. खरे तर पुणे शहरात दोन रिंग रोड तयार होणार आहेत एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे तर […]

अधिक वाचा..

शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक

शिरुर (तेजस फडके): पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दाणेवाडी येथुन रविवार (दि १६) रोजी एका आरोपीला रात्री अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०) रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..
shirur-hut-fire

शिरूर तालुक्यात घरगुती व प्रापंचिक वादातून स्वतःच्याच झोपडीची केली राख-रांगोळी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष […]

अधिक वाचा..
shridhar-tambe-ganegaon

सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर तांबे यांचे निधन

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर दशरथ तांबे (वय ६९, रा. गणेगाव खालसा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी (ता. १३) निधन झाले. गुरुवारी सकाळी शेतातील कामे आटोपून घरामध्ये आराम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. श्रीधर तांबे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा […]

अधिक वाचा..