भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली…

औरंगाबाद: देशाची राजधानी दिल्लीत दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जवळपास दोन मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता […]

अधिक वाचा..

राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे […]

अधिक वाचा..

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री शिंदे – फडणवीस यांची शपथ असंविधानिक; महेश तपासे

मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली ही शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे सत्तासंघर्षाचा प्रश्न […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांनी दावोसमधल त्यांच वेळापत्रक समोर आणाव; आदित्य ठाकरेंच खुल आव्हान…

दावोसला जाऊन तुम्ही काय केलं त्यावर डिबेट करा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज… मुंबई: शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात मोठा दावा केला. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी […]

अधिक वाचा..

पोलीस असल्याचे भासवत युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील SBI चौकामध्ये एक मुलगी तिच्या मित्रासोबत सेल्फी काढत असताना एका व्यक्तीने त्या दोघांना आपण पोलिस असल्याचे सांगुन मला तुमची तपासणी करायची आहे असं सांगुन बंद पडलेल्या कोविड सेंटर मध्ये नेले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत त्यांचा मोबाईल काढुन घेत मुलीचा विनयभंग करुन अंधाराचा फायदा घेत […]

अधिक वाचा..

शिवसेना- वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतोच कुठे? का गैरसमज पसरवत आहात…

मुंबई: शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरवण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा…

मुंबई: कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. पणन महासंघ अधिमंडळाची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री सावे बोलत होते. सहकार मंत्री सावे […]

अधिक वाचा..

शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही; जयंत पाटील

आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार… मुंबई: शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे यांना क्रांतीचौक येथील कार्यालय रिकामी करण्याबाबत बँकेची नोटीस…

शिर्डी: औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या इमारतीत भाडेकरु असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवल्या आहेत. त्यामुळे आता दानवे यांना आपलं कार्यालय इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली आहे. तर सरकारने गाळेधारकांना ती इमारत विकावी […]

अधिक वाचा..