विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..

मलठण येथून विवाहीत महीला बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथून कान्हुपात्रा विशाल कदम (वय २५) मुळगाव वसवाडी, बार्शीरोड, पाकरसांगवी, राजेशिवाजीनगर, जि. लातुर ही महीला मलठण येथील मोमीन भाभी यांच्या खोलीत भाडयाने राहत असून राहत्या घरातून ती बेपत्ता झाली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, की विशाल कदम यांची पत्नी कान्हूपात्रा कदम (दि. १५) जानेवारी रोजी सकाळी ११: ५३ वा. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये रस्ते सुरक्षा अभियान साजरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीसांनी व नागरिकानी एकत्रित येवुन रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी व्हावे. या करता प्रयत्न करावेत व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी केले. शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये शिकारीच बनला शिकार

नागाने गिळला चक्क चारफुटी विषारी घोणस साप शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शिकारीच्या शोधात असलेल्या घोणस सापाचीच एका नागाने शिकार केल्याची घटना घडली. मात्र यावेळी घोणस सापाचा मृत्यू झाला असून नागाला सर्पमित्रांकडून जीवदान देण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे उल्हास जगताप यांच्या घरासमोर भलामोठा नाग एका अजगरा ससारख्या एका सापाला […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर प्रवासी महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अहमदनगर ते पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा अज्ञात व्यक्तीकडून एस टी बसमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रवास करताना अहमदनगर येथून एम एच ४० एन ९३५० […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांचे सुडाचे राजकारण

ऊसतोडीसाठी आमदाबाद गावात टोळयाच दिल्या नाहीत शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावातील ऊसतोडीसंदर्भात घोडगंगा साखर कारखाना, न्हावरे सुडाचे राजकारण करीत असून आमदाबाद गावातून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलच्या विरोधात दोन उमेदवार उभे केले होते. त्याचा राग मनात धरुन या गावातील उसतोडीसाठी टोळ्याच पाठवल्या जात नसल्याचे आमदाबाद येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

MIDC टप्पा क्रमांक 3 मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायात प्राधान्य द्या; अ‍ॅड शरद बांदल

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव गणपती MIDC तील टप्पा क्रंमाक 3 साठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने करडे आणि सरदवाडी येथील जमीन संपादित केली असुन त्यामध्ये आयएफबी (IFB) या कंपनी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन या कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायामध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी […]

अधिक वाचा..
crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

जांबुत सहकारी सोसायटीचे संचालक नाथा जोरी यांचे संचालकपद बरखास्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जांबुत सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरुर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी (दि. १२) जानेवारी २०२३ रोजी दिला आहे. या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक […]

अधिक वाचा..