crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि १५) रोजी सायंकाळच्या सुमारास मलठण ता. शिरुर, जि. पुणे गावच्या हद्दीत हॉटेल ओमकार हॉटेलच्या आडोशाला मालक नितीन एकनाथ चोरे (वय ४० वर्षे) रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे याने त्याचा कामगार वैभव शांताराम कुटे (वय ४२ वर्षे) सध्या रा. ओमकार हॉटेल, मलठण, ता. शिरुर जि. पुणे मुळगाव पालगड ता. दापोली, जि. रत्नागिरी, याच्या मार्फत हॉटेलच्या आडोशाला बिगर परवाना देशी-विदेशी दारु बेकायदेशीर विक्री करत असताना पोलिसांची चाहूल लागताच नितीन चोरे हा पळून गेला असल्याने कामगार आणि हॉटेल मालक यांच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असुन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हवालदार आगलावे हे करत आहेत.