शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असुन काही महिन्यांपुर्वी शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी सैनिकाने स्वतःच्या पत्नीवर गोळ्या झाडत तिची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.   काल मंगळवार (दि १६) रोजी दुपारी ५ च्या सुमारास करडे (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच आणि […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप, विनापरवाना झाडे पाडत केले बांधकाम; कारवाई करा, नागरीकांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गट न.२६७ मध्ये वनविभागाची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडुन अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असुन कोणतीही परवानगी न घेता मोठी झाडे तोडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबतची माहीती […]

अधिक वाचा..

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पाबळफाटा ते मोती नाला राज्य मार्ग १०३ या रस्त्याचे काम सुरु असुन ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन या कामाच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर होत आहे. शिरुरचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हे दोन किलोमीटरच्या अंतरावर असुनही तेथील आधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम पाहायला वेळ नाही का…? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडुन […]

अधिक वाचा..

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC त काम करणाऱ्या चार कामगारांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाकडुन फोन पे द्वारे ७५ हजार रुपयांची खंडणी वसुल करुन अजुन २५ हजारांची मागणी करणाऱ्या खंडणी खोरांकरुन सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या एक तासात अपहरण झालेल्या चार कामगारांची सुटका करुन एका खंडणीखोराला अटक करण्याची धाडसी कामगिरी रांजणगाव […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये मनसेचे महिबबु सय्यद हे आपल्या कार्यकर्त्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. शिरुर नगरपरिषदेला गेले दोन वर्षे पासून अनेक विषयांचा पाठपुरावा करुनही अनेक विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि ८) जुलै पासुन आमरण उपोषणाला बसले आहे.   अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय […]

अधिक वाचा..

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील जिल्हा परीषद शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांनी शिक्षणविस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना (दि. २८) जून रोजी मारहाण केली होती. त्यानंतर तातडीने त्या दोघांवर गटविकास आधिकारी महेश डोके यांनी (दि १) जुलै रोजी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु ते […]

अधिक वाचा..

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दिड हजार रुपये देण्याची घोषणा केली हि चांगली बाब आहे. परंतु त्याच बरोबर लाडक्या दाजींच्या दुधाला आणि शेतमालाला पण चांगला बाजारभाव द्यावा. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी असा खोचक टोला डॉ अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लागवला.   लोकसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक…हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत…

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील आण्णापुर हद्दीत ३ हेक्टर ७१ गुंठे क्षेत्रात शासकीय पाझर तलाव आहे. या तलावामधून अंदाजे ३५ ते ४० हजार ब्रास वाळू ,मुरूम, दगड गोटे यांचे अवैध उत्खनन होऊन त्याची वाहतूक करुन वाळुमाफीयांनी तसेच महसुलमधील काही भ्रष्ट आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची विक्री करुन कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. यामध्ये महसूलमधील काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर (तेजस फडके) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली असुन […]

अधिक वाचा..

शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके) स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण राज्यात 1 जुलै ला कृषि दिन साजरा केला जातो. शिरुर येथे पंचायत समिती शिरुर व तालुका कृषी अधिकारी शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर पंचायत समिती येथे संपन्न झाला कार्यक्रमात बांबु लागवड व रेशीम उद्योग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना […]

अधिक वाचा..