जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज रोजगारात कामातील योग्य बदल आकर्षक ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल.  व्यापारात यश मिळणार आहे. संयमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. वृषभ: आज नोकरदारास स्नेहपूर्वक वातावरण अनुभवता येईल. आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असेल. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार […]

अधिक वाचा..

मुजोर कंपनी व प्रशासनाचा निषेध करुन शिरुर तहसिल कार्यालयासमोर केले सामूहिक मुंडण

शिरुर (अरुणकुमार मोटे): प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी कैलास वसंत कर्डिले हे (दि. १३) जुलै रोजी पासून उपोषणास बसले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने व आय. एफ. बी कंपनीने दखल न घेतल्यामुळे निषेध म्हणून शिरुर तहसिल कार्यालयासमोर तरुणांनी सामुहिक मुंडन केले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महीला वर्ग हजर होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव […]

अधिक वाचा..

सख्खा भाऊच झाला भावाचा वैरी, धारदार कोयत्याचा धाक भावाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ काही कारणास्तव एकमेकांच्या जीवावर उठले आहे. धारदार कोयत्याच्या सहाय्याने धाक दाखवत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भावाने भिती पोटी शिरूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गोलेगाव (ता. शिरूर) येथील श्रीकांत बबन भोगावडे (वय 38) यांना […]

अधिक वाचा..

राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य; चंद्रकांत पाटील

मुंबई: सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला […]

अधिक वाचा..

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे धोरण नाही; दिपक केसरकर

मुंबई: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे कोणतेही धोरण नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री केसरकर म्हणाले, कॅशलेस आरोग्य योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध नाही. त्यामुळे ती शिक्षक व शिक्षकेतर […]

अधिक वाचा..

कायम शब्द वगळलेल्या पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा लागू; दीपक केसरकर

मुंबई: कायम शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील पात्र तुकड्या व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अनुदान पात्र अघोषित शाळांना 20 टक्के व यापूर्वी 20 अथवा 40 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून 61 हजार शिक्षकांना मूळ प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत 50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू; दिपक केसरकर

मुंबई: शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ही प्रक्रिया थांबवलेली नसून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी यासंदर्भातील […]

अधिक वाचा..

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार; रविंद चव्हाण

मुंबई: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती […]

अधिक वाचा..

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार; उदय सामंत

मुंबई: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार […]

अधिक वाचा..

पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 5 कोटींची तरतूद; दादाजी भुसे

मुंबई: परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. पाथरी येथील बसस्थानकातील छताचे प्लास्टर कोसळून तीन महिला जखमी झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. मंत्री भुसे म्हणाले, […]

अधिक वाचा..