नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून सभागृहात पुन्हा ‘राडा‘

महाराष्ट्र

मुंबई: नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी वरून सभागृहात सलग दुसऱ्या दिवशी राडा बघायला मिळाला, भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांसमोरच परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.

थोरात म्हणाले, नाशिक मुंबई वाहतूक कोंडीच्या संदर्भात सभागृहात आपण काल चर्चा केली. अध्यक्षांनी स्वतःही चर्चा गांभीर्यपूर्वक ऐकली त्यानंतर काही निर्देशही दिले. मात्र तरीही वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत तसूभर ही फरक पडायला तयार नाही. थोरात यांनी सभागृहात शाळकरी मुलांसोबत घडलेली घटना विशद केली, ते म्हणाले दुपारी बारा वाजता वाहतूक कोंडीत अडकलेली लहान लहान शाळकरी मुले सायंकाळी पाच वाजता वाहतूक कोंडीतून बाहेर पडली. हे अत्यंत चुकीचे आणि गंभीर आहे.

यानंतर भडकलेले थोरात म्हणाले की, मंत्रीमहोदयांचे गांभीर्य या विषयाबाबत दिसले नाही. अध्यक्षांनी सूचना देऊनही, अंमलबजावणी झालेली नाही. मंत्री महोदयांनी या विषयाबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. ‘नोंद घेतली‘ किंवा ‘होय‘ अशी उत्तरे देऊन चालणार नाही.