मुंबई पालिका मुख्यालयात पालकमंत्री लोढांचे दालन…

महाराष्ट्र

मुंबई: भाजपचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दालन सुरु झाल्याने आता नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इतर सर्व पक्षांची कार्यालये सील केली असताना आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या या दालनात भाजपच्या माजी नगरसेवकांची वर्दळ वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

पालकमंत्र्यांच्या नावाखाली हि तर भाजपने महापालिकेत केलेली घुसखोरी आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.फेसबुक पोस्ट करत मातेले यांनी मंगलप्रभात लोढा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि राज्य साकार चुकीचा पायंडा पाडत आहे. पालकमंत्री पदाच्या आडून राज्य सरकारने मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यालय दिले आहे. प्रशासक असतानाच्या काळात इतर राजकीय पक्षांची कार्यलये सील करून भारतीय जनता पक्षाला तिथे कार्यालय देणे साफ चुकीचे आहे. पालकमंत्री पदाच्या नावाखाली राज्य सरकारने हुकूमशाही आणि दडपशाहीच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेत एकप्रकारे घुसखोरीच केली आहे, अस आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी म्हटल आहे.

दरम्यान, आता मुंबई महापालिकेत असलेली लोढांच्या दालनावर वरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले असून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना भाजप कशाप्रकारे उत्तर देतेय हे पाहावे लागेल.