चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण सरकारने विशेष शोध मोहीम राबवावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत […]

अधिक वाचा..

जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय सत्याचा नाही, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा टोला

नागपूर: चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून उद्या काँग्रेसचा महापौर होणार असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिका महापौर पदावर काँग्रेसचाच दावा; दिल्लीत उद्या निर्णायक बैठक; विजय वडेट्टीवार

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यापूर्वी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीनंतर महापौर पदाबाबत अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसावा यासाठी पक्षात हालचाली सुरू आहेत. मात्र काही घडामोडींमुळे […]

अधिक वाचा..

मुंबईचे लचके तोडले जात आहे, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जात आहे; विजय वडेट्टीवार 

नागपूर: महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे,मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी […]

अधिक वाचा..

नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर

ब्रह्मपुरी मुल, नागभीड, घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा, राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ […]

अधिक वाचा..