नीट पेपरफुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र

नागपूर: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी नागपूर येथे केली.

केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिकतेच्या आधारावर आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता, असे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनीही हीच मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी सरकारला नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात मोटेगावकर किंवा Amit Deshmukh यांच्या जुन्या विधानांचा आधार घेत सरकार स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही.

राज्यात निर्माण झालेला डिझेल-पेट्रोल तुटवडा आणि आगामी काळात केवळ २५ टक्के खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे विधान चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी, “डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार?” असा सवाल उपस्थित केला.

सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे. मात्र सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती तरुणांना “कॉकरोच” म्हणते, तेव्हा त्यांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.सरकारचा एकूण कारभार पूर्णपणे तरुणविरोधी असून, आता तरुणांमधील नाराजी उघडपणे व्यक्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत