ranjangaon-midc-electricity

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराला अचानक विजेचा धक्का बसल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात आल्याची चर्चा औद्योगिक परिसरात रंगली आहे. खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

महसुल सेविका वृषाली घुलेचा राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत गौरव

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यस्तरीय महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच नांदेड येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये खोखो आणि रनिंग (धावणे) या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथिल महसुल सेविका वृषाली संतोष घुलेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. वृषाली घुले हिने खेळात दाखवलेला […]

अधिक वाचा..

त्या कामगाराची व्हिडीओ रेकॉर्ड करून आत्महत्या; इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा

लोणी काळभोर: ‘मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, यांनी आख्ख मला वाटला लावलं, या चार पाच जणांनी.’ अशी आत्महत्येपूर्वी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड करून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या पाठीमागील वस्तीत बुधवारी (ता.6) रात्री साडेआठ […]

अधिक वाचा..

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करणारा माजी खासदार ठरला दोषी

बंगळूर: हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या बंगळूरमधील विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला. आज (२ ऑगस्ट) न्यायालय शिक्षेचा कालावधी जाहीर करणार आहे. न्यायालयात प्रज्वल रेवण्णांना कोसळलं रडू निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते […]

अधिक वाचा..

सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार पुरस्कार वितरण मुंबई: राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई […]

अधिक वाचा..

ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू…

चाकण: चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे, ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७), रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा

नागरिकांची लूट, पोलिसांची दुर्लक्ष शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांतर्गत गरीब आणि गरजू कामगार लाभार्थ्यांना मोफत अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वितरित केले जात आहे. परंतु, शिरूर शहरासह तालुक्यात काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली दलालांनी उघडपणे पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांची खुलेआम फसवणूक होत असून, पोलिस […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीच्या बांधकामस्थळी अपघात; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्याच्या व्हिडीओने खळबळ

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील एका कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्याचा एक हृदयद्रावक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर जातीय द्वेषातून अन्याय करत आहेत, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका भरती; छ. संभाजीनगर जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असल्याने अंगणवाडी सेविका भरतीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे! केवळ १२ वी पात्रता आवश्यक असली तरी, बी.एड., डी.एड., इंजिनीअरिंग आणि पदवीधर महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. ८२४ जागांसाठी तब्बल ८,०३९ अर्ज प्रत्येक जागेसाठी १० जणांचा संघर्ष फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक १,५८० अर्ज शिक्षण आणि निश्चित वेतनामुळे भरतीसाठी तीव्र स्पर्ध […]

अधिक वाचा..