डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल (दि 25) रोजी शिरुरच्या पुर्वभागात डॉ अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा होता. त्यावेळी शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात कोल्हे यांनी जाण टाळल त्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत डॉ कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? असा सवाल उपस्थित केला आहे.

 

मागील लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदार संघात दौरा करत पुर्व भागातील सर्व गावात भेट दिली होती. त्यानंतर डॉ अमोल कोल्हे यांनी पाच वर्षे काही गावांचा अपवाद वागळता परत एकाही गावात परत पाय ठेवला नाही किंवा खासदार निधीतुन एकही विकासकाम केलं नाही. त्यामुळे कोल्हे यांनी सर्वसामान्य लोकांचा भ्रमनिरास केला. तसेच डॉ अमोल कोल्हे हे अभिनेते असल्यामुळे लोक त्यांना मतदार संघात येण्यासाठी वेळच नसतो. त्यामुळे मतदार आधीच कोल्हे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.

 

परंतु काल (दि 25) रोजी पुर्वभागात डॉ कोल्हे यांचा नियोजित दौरा असतानाही शिंदोडी, गुनाट आणि चिंचणी या गावात डॉ कोल्हे यांनी जाण्याचं टाळलं. त्यामुळे या तीनही गावांच्या ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली असुन डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात या तीन गावातील मतदारांची नाराजी डॉ कोल्हे यांना भोवणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरुर तालुक्यात पाच वर्षात ना खासदार अमोल कोल्हे गावात आले ना त्यांचा खासदार निधी आला

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत