tanaji-dharne-helpata

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर तालुका

शिरूर : शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी धरणे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (शिरुर)च्या वतीने तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ या कादंबरीला ८ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मध्ये पी एच डी संशोधन अभ्याससाठी झालेली ‘हेलपाटा’ कादंबरीची निवड याचे औचित्य साधुन विद्यालयात तानाजी धरणे यांचा सपत्निक शाल श्रीफळ देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला आहे. या प्रसंगी विद्यालयातील बाळासाहेब जाधव सर, जालिंदर जाधव सर, प्रताप भोईटे, संजय गायकवाड सर, बाळु मदने, अशोक गारगोटे, नवनाथ जाधव व इतर मान्यवर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

ज्या संस्थेत आपण शिक्षणाचे ‘बाळकडू’ घेतले त्याच संस्थेच्या विद्यालयात आपण लिहिलेल्या ‘हेलपाटा’ कादंबरीचे नाव विद्यालयाच्या फळ्यावर कोरलेले पाहtन ” या सारखा दुसरा आनंद जीवनात नाही ” असे मत तानाजी धरणे यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यालयाने केलेला सत्कार व आदरातिथ्य पाहून आपण भारावून गेल्याचे मत लेखक तानाजी धरणे यांनी बोलताना व्यक्त केले. ‘संघर्ष केल्याशिवाय यशाची फळे चाकखा येत नाहीत , तसेच जीवनात संघर्ष केल्याशिवाय इच्छित स्थळापर्यंत पोहचता येत नाही ” असे मत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडले .

हेलपाटा कादंबरीच्या यशाबद्दल बोलताना या वर्षात ” हेलपाटा ” कादंबरीला ८ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व phd संधोधन अभ्यासात ” स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे समावेश झाल्याचे ऐकूण विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजऊन दाद दिली. या प्रसंगी बाळासाहेब जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना ” हेलपाटा ” कादंबरीचे अंतरंग उलगडून सांगीतले. हेलपाटा कादंबरीला साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे साहित्य वाड् मय पुरस्कार २०२४ मिळाल्याचे सांगितले. तसेच हेलपाटा वाचून आजच्या तरुणांना आपले भविष्य घडवताना निश्चित उपयोग होईल, असा सरांनी विश्वास व्यक्त केला. विद्यालयाने केलेले आदरातिथ्य व सन्मान पाहुन आपण भाराऊन गेलो असून तो आपण जीवनात कधीही विसरु शकत नाही असे भावनिक उद्गार तानाजी धरणे यांनी काढले व सर्व सन्मानिय गुरुजन व प्राचार्य सरांचे आभार ऋण व्यक्त केले. या प्रसंगी बाळासाहेब जाधव सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

‘हेलपाटा’ ही वंचीतांच्या संघर्षशील जीवनाचं वास्तव अधोरेखीत करणारी कादंबरी!

तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ कादंबरीचे समिक्षण…

आंबळे येथील तानाजी धरणे यांचे ‘हेलपाटा’ कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत