Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिल.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. डॉ. कोल्हे यांनी २०१६ मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता.

 

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकल्यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवला. अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे.

 

विरोधक बालिशपणाच राजकारण करतायेत. पण हे करुन ही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो. एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे ठणकावून सांगितलं. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणालेत.

 

२०१६ ला ओवेसींच्या सभेला केला होता विरोध

डॉ अमोल कोल्हे यांनी २०१६ ला पुण्यात होणाऱ्या ओवीसीच्या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी हा विरोध केला होता, आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र यासंदर्भात डॉ कोल्हे यांना कोणतेही कल्पना नव्हती. तसेच पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती. हीच बाब डॉ. कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगा समोर स्पष्ट केली.

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल

शिरुर तालुक्यात पाच वर्षात ना खासदार अमोल कोल्हे गावात आले ना त्यांचा खासदार निधी आला

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत