dead

रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा उंचावरुन पडल्याने मृत्यू…

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील K K नाग कंपनीत उंचावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील के के नाग कंपनीत गोडाऊनचा पत्रा बसवण्याचे काम चालू होते. यावेळी जोरात वारा आल्याने हे काम करणारा कामगार वरुन खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. विठ्ठल सिताराम कदम (वय २१, रा. काळुस ता खेड जि पुणे) असे या कामगाराचे नाव आहे. याबाबत तुकाराम कदम यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विठ्ठल कदम हा रविवारी (ता. १०) के के नाग कंपनीत गोडाऊनचा पत्रा बसविण्याचे काम करत होता. दुपारी १ च्या सुमारास जोराचा वारा आल्याने त्याचा तोल गेला त्यामुळे तो थेट खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने शिरुर येथील खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत रांजणगाव पोलिस ठाण्यात सदर कामगाराचा भाऊ तुकाराम कदम याने फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे पुढील तपास करत आहेत.’

unique international school
unique international school