वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची; ‘स्वामित्व’ योजनेचा उद्या शुभारंभ

इतर

मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३०,५१५ गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे.

स्वामित्व योजनेची उद्दिष्टे

गावांमधील मालमत्तांची स्पष्टता निर्माण करणे.

डिजिटल प्रॉपर्टी कार्डद्वारे मालमत्ता व्यवस्थापन सुलभ करणे.

शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

मालमत्तेसंबंधी वाद मिटवून सामाजिक सलोखा निर्माण करणे.

ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण बनवणे

योजनेंतर्गत लाभ व फायदे

मालकी हक्क मिळणार

वाडवडिलोपार्जित जमिनीवरील हक्कांसाठी डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल

गावकऱ्यांना जमिनीच्या मालकीची अधिकृतख मिळेल, जी त्यांच्या हक्कांसाठी महत्त्वाची ठरेल.

मालमत्तेवरील विवाद सोडवण्यासाठी मदत

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मालमत्तेचे वाद ड्रोनद्वारे केलेल्या अचूक सर्वेक्षणामुळे मिटतील.

मालमत्तेची अधिकृत माहिती मिळाल्याने तक्रारींचे प्रमाण कमी होईल.

बँक कर्ज मिळवण्यासाठी सोय

प्रॉपर्टी कार्ड हे बँकेच्या कर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाचे साधन ठरेल.

शेतकऱ्यांना व्यवसाय, शेतीसाठी कर्ज घेणे सोपे होईल.

ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार

मालमत्तेवर योग्य प्रकारे कर आकारता येईल.

ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होऊन स्थानिक विकासासाठी निधी मिळेल.

आदिवासी व दुर्बल घटकांसाठी फायदेशीर

आदिवासींना वारसाहक्काची ओळख मिळेल.

स्थानिक पातळीवर अन्याय किंवा फसवणूक टळेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण: प्रत्येक गावातील मालमत्तांचा अचूक नकाशा तयार केला जाईल.

डिजिटल नकाशे तयार करणे: जमिनींच्या मर्यादा, आकार, आणि स्थान यांची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल.

ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य.

मालमत्तांचे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे नागरिकांचे आर्थिक पतपुरावे वाढतील.

बँकांमधून अधिक व्यवहार सहज होतील, परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उभारणे सोपे होईल.

उद्घाटनाचे ठळक वैशिष्ट्ये 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्य प्रणालीद्वारे नागरिक व लाभार्थ्यांशी संवाद साधणार.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती, राज्याच्या ३० जिल्ह्यांत मंत्री वर्ग कार्यक्रमात सहभागी होणार.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहतील.

हे होणार परिणाम…

गावपातळीवरील सर्व मालमत्तांची नोंद अधिकृत स्वरूपात केली जाईल.

ग्रामविकासाला गती मिळून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची उपलब्धता वाढेल.

नागरिकांचे मालकी हक्क सुरक्षित होतील आणि वंशपरंपरागत मालमत्तेवरचे प्रश्न निकाली निघतील.

स्वामित्व योजना ग्रामीण भागात न्याय, प्रगती आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिणार आहे 🏡. ही योजना केवळ मालमत्तेचे हक्क देणार नाही, तर ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडवेल.