शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी घेतला अखेरचा श्वास

इतर

मध्य प्रदेश: द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे रविवार (दि. 11) रोजी  निधन झाले. ते 99 वर्षांचे होते.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरु मानले जात. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते.
स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरु केला