शिरुर पोलीसांकडून अल्पवयीन व बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कारवाई

इतर

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरांमध्ये शिरुर पोलिस स्टेशन वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बी जे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालक यांच्या 42 वाहनांवर कारवाई करत 74 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. शिरुर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल चालवणे अशा वाहन चालकावर सप्टेंबर महिन्यामध्ये 564 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 78 हजार 900 ऑक्टोबर महिन्यामध्ये 661 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 78 हजार 500 आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 594 वाहनांवर कारवाई करत 5 लाख 27 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला.

मागील तीन महिन्यामध्ये एकूण 1819 वाहनांवर कारवाई करत 13 लाख 84 हजार 900 रुपये दंड करण्यात आला असून यापुढे ही कारवाई अजून तीव्र करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी वाहतूक अंमलदार यांना दिले असून सदरची कारवाई निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंबे यांच्या वाहतूक शाखेमार्फत करण्यात आलेली आहे.

आपल्या 18 वर्षा खालील लायसन नसलेल्या पाल्यांना मोटर सायकल चालवण्यास देऊ नये अन्यथा वाहन मालक (पालक ) यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

सुरेशकुमार राऊत

पोलिस निरीक्षक, शिरुर