क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतीये टाटा ब्लॅकबर्ड कार, लूक पाहून प्रेमात पडाल…

इतर

मुंबई: टाटा मोटर्स लवकरच एक नवीन SUV घेऊन येत आहे. कंपनी देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Tata Nexonवर आधारित SUV Coupe वर काम करत आहे.

या कारला 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही सब-कॉम्पॅक्ट नेक्सॉनपेक्षा अधिक लांब असेल. हिची लांबी जवळपास 4.3 मीटर एवढी असेल. टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस सारख्या कारसोबत असेल. Nexon Coupe ही रेग्युलर नेक्सॉनच्या X1 आर्किट्रेक्चरवरच तयार केली जाईल. या शिवाय हिच्यात साईजनुसार काही मॉडिफिकेशनही केले जाऊ शकतात.

गाडीची लांबी वाढविण्यासाठी मागचा भाग स्ट्रेच केला जाऊ शकतो. हिच्या व्हीलबेसमध्ये 50mm ची वाढ होण्याचीही शक्यता आहे. तसेच, रेग्युलर नेक्सॉनपेक्षा वेगळी बनवण्यासाठी हिच्यात काही बाह्य बदल होणे अपेक्षित आहे. हिच्या पुढील आमि मागील बाजूसही काही बदल केले जाऊ शकतात. मात्र, ए पिलर्स आणि फ्रंट दरवाजा तसाच ठेवला जाईल.

Nexon Coupe मध्ये नवे 1.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे 160 hp चा मॅक्सिमम पॉवर आउटपुट देऊ शकेल. 1.5-लिटर रेव्होटॉर्क डिझेल इंजिनला अधिक पॉवर आणि टॉर्क आउटपुट देण्यासाठी अपग्रेड केले जाईल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये ऑप्शन मिळेल.

खरे तर, टाटा ब्लॅकबर्डची कंपनी बऱ्याच दिवसांपासून तयार करत आहे. गेल्या 2018 पासून या गाडीची चर्चा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, या एसयूव्हीच्या फीचर्स संदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही.