सात पोरांच्या बापाने केली चक्क पाचव्या लग्नाची तयारी अन…

इतर
उत्तर प्रदेश: लग्नाची भारी हौस असलेल्या एका व्यक्तीने 5 व्या निकाहची तयारी सुरु केली होती. याबाबात त्याच्या मुलांना कळताच ही मुलं निकाहस्थळी आली आणि त्यांनी तिथे सॉलिड गोंधळ घातला.
उत्तर प्रदेशातील सीतापूरमधल्या सरदार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या शफी अहमद याने 5 वं लग्न करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्याने जोरात तयारीही सुरु केली होती. रात्रीच्या सुमारास गुपचूप निकाह करायचा असं त्याने ठरवलं होतं. ही बाब त्याच्या 7 मुलांना कळाली. ही मुलं आणि शफी अहमदच्या सगळ्या बायका एकत्र आली आणि त्यांनी शफीला धडा शिकवायचं ठरवलं.
ही सगळी मंडळी जेव्हा निकाह होत असलेल्या ठिकाणी पोहोचली तेव्हा शफीच्या होणाऱ्या बायकोच्या घरच्यांनी त्यांना अडवलं. यामुळे तिथे राड्याला सुरुवात झाली होती. शफीच्या मुलांनी म्हटलंय की त्याने पहिल्या बायकोला तलाक दिला होता. दुसरं लग्न केल्यानंतर शफीने तिसरं आणि चौथं लग्न गुपचूप पद्धतीने केलं होतं. एकामागोमाग एक असा लग्नाचा धडाका लावणारा शफी घरखर्चाला पैसे देत नसल्याने त्याच्या 4 बायका आणि 7 मुलं त्याच्यावर संतापली होती. यामुळे त्यांनी शफीला धडा शिकवायचं ठरवलं होतं