तान्ह्या लेकरासाठी मातेची थेट वाघाशी झुंज पहा त्याचाक्षणी वाघाने…

इतर

मध्य प्रदेश: वाघ! असा शब्द उच्चारला तरी अनेकांचा थरकाप उडतो, इतकेच नव्हे तर वाघ पाहिल्यावर काही जण बेशुद्ध देखील पडू शकतात. मात्र कोणतीही माता आपल्या मुलाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावू शकते, याचा प्रत्यय नुकताच आला.

मध्य प्रदेशात एका मातेने आपल्या नवजात शिशुला वाघाच्या जबड्यातून वाचविण्यासाठी चक्क मृत्यूशी झुंज दिली असे म्हणावे लागेल, तसेच तिने त्या बाळाला त्याच्या तावडीतून सोडविले, मात्र सध्या ती रुग्णालयात दाखल असून तिची अवस्था गंभीर आहे, असे सांगण्यात येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या १५ महिन्यांच्या बाळाला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका आईने थेट वाघाशी लढा दिल्याची घटना घडली आहे. एक-दोन मिनिटे नाही तर तिचा आणि वाघाचा हा लढा सुमारे २० मिनिटे सुरु होता. या लढाईत वाघाची नखे तिच्या फुफुसात घुसली. पण या आईने हिंमत हरली नाही.

अखेरीस वाघाला या आईपुढे माघार घ्यावी लागली. आईने वाघाच्या जबड्यातून तिच्या बाळाची सुटका करण्यात यश मिळवले आहे. या लढाईनंतर या आईची परिस्थिती नाजूक आहे. सध्या तिच्यावर जबलपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात रोहनिया गावात हा प्रकार घडला आहे. बांधवगड टायगर रिझर्व्ह परिसरात हा प्रकार घडला. मानपूरच्या बफर झोनला लागून असलेल्या ज्वालामुखी वस्तीतील अर्चना चौधरी रविवारी सकाळी १० च्या सुमारास, १५ महिन्यांचे बाळ राजवीरला घेऊन चालल्या होत्या. याचवेळी झुडुपांत लपून बसलेला वाघ, लाकडी काट्यांचे कुंपण ओलांडून आत आला आणि त्याने लहान बाळावर हल्ला केला. वाघाने या बाळाला त्याच्या जबड्यात पकडून ठेवले होते.

आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आई अर्चना थेट वाघाला भिडली. यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या संघर्षात वाघाने तिच्या फुफुसात नखे खुपसली आहेत. सुमारे २० मिनिटे या दोघांमध्ये हा संघर्ष सुरु होता. हा आवाज ऐकून वस्तीत राहणारे स्थानिक हातात लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वाघ त्या बाळाला सोडून जंगलात पळून गेला. त्यानंतर बाळावर आणि आईवर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन, त्यांची रवानगी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली.

जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर, वाघाशी झालेल्या संघर्षात अर्चना यांची मान तुटली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अर्चना यांना जबरपूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारण या महिलेच्या पाठीवरही वाघाच्या नखांचे गंभीर घाव आहेत. टाके घातल्यानंतरही रक्त थांबत नाहीये. बाळाच्या डोक्यालाही दुखापत झाली होती, मात्र आता त्याची प्रकृती चांगली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, सिधी जिल्ह्यात संजय टायगर बफर झोनमध्ये बाडीझारीया गावात एक आई आपल्या मुलासाठी बिबट्याशी लढली होती. त्याही वेळी बिबट्याने माघार घेतलयाने बाळाचा जीव वाचला होता. बिबट्याने बाळाला उचलून नेल्यानंतर एक किलोमीटर त्याच्या पाठीमागे जाऊन बिबट्याशी या आईने संघर्ष केला होता. आदिवासी महिला किरण बैगा असे तिचे नाव होते. कोणत्याही हत्याराविना तिने हा संघर्ष केला होता.