शिरुरमध्ये शासनाच्या वतीने भव्य महासेवा शिबीराचे आयोजन…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा (दि. १७) सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर असा राबवण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागाकडील प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

त्याअनुषंगाने संपुर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजे (दि. २१) सप्टेंबर रोजी महासेवा दिन आयोजित करण्यात येत असुन त्याचाच भाग म्हणून शिरुरमध्ये देखील भव्य महासेवा दिन आयोजित करण्यात आलेला असून त्याचा नागरीक, विदयार्थी, लाभार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे नियंत्रन व समन्वय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे महसुल नगरविकास ग्रामविकास, महावितरण, पोलिस, आरोग्य, कृषी पशुसंवर्धन शिक्षण आपले सरकार पोर्टल व राज्य शासनाच्या इतर सर्व विभागाच्या योजनांचा, सेवांचा व प्रलंबित अर्जाचा लाभ नागरीक, विदयार्थी व लाभार्थी यांनी (दि. २१) सप्टेंबर रोजी जुनी नगरपरिषद इमारत मंगल कार्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या महासेवा दिन शिबीरा मध्ये घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी तथा उपविभागीय आधिकारी संतोष कुमार देशमुख व शिरुर तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी केले आहे.