शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन चालवत गोंधळ घालणाऱ्या आणि इयत्ता 10 च्या पेपरच्या अनुषंगाने परिक्षा केंद्र कॉफी मुक्त अभियाना अंतर्गत साध्या वेशातील पोलिसांच्या मार्फत परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने विनाकारण फिरणाऱ्या तसेच वारंवार मारणाऱ्या 46 बेशिस्त वाहन चालकांवर 1 लाख 15 हजार 500 रुपये दंड आकारणी केली आहे.
मलठण येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर फिरणारे बेशिस्त वाहनचालक, तसेच मोठया आवाजाचे हॉर्न वाजवणे, सायलेन्सरचा आवाज काढणे आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी धुमाकूळ घातला होता. या गोष्टीची कल्पना शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळताच त्यांनी वाहतूक शाखा तसेच डी बी पथक यांना पाठवत मलठण गावामध्ये व परिक्षा केंद्र परिसरात अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून मोटार सायकल चालवताना, ट्रिपल सीट फिरताना, विना नंबर प्लेट मोटार सायकल आणि विनाकारण हॉर्न वाजवत असताना मिळून आल्यास, सदरची कारवाई आणखीन कठोर करण्याबाबतचे आदेश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. हि कारवाई पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार पवार व पोलीस मित्र बाळासाहेब झिंजुरके यांनी केली आहे.