उन्हाळ्यात सब्जा चे फायदे 

आरोग्य

आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तसा उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते.

नाकातून रक्त येते, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वांवर *सब्जा* उपयुक्त उपाय आहे.

सब्जा, चवीला गोड आहे. आणि शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. भरपुर प्रथिने असतात, यांत फायबर, ओमेगा, फाँलिक अँसिड, कँलशिअम, मँग्नेशिअम, लोह, व्हिटमिन सि, ए, भरपुर प्रमाणात आहे.

फायदे

(१) सब्जामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सब्जामध्ये कँलरीजचे प्रमाण अधिक असते.

(२) सब्जामध्ये अल्फा लिनिलेनिक अँसिड असते. ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. रोज रात्री पाण्यात भिजवून त्यात लिंबु रस व मध मिसळून ठेवा. सकाळी घ्यावे.

(३) त्वचा विकारांसाठी सब्जा लाभार्थी आहे. त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, तजेलदार राहते.

(४) मधूमेहावर गुणकारी आहे. साखर नियंत्रित राहते.

(५) पोट साफ करण्याचे उत्तम औषध आहे. बी पाण्यात भिजवून सकाळी घ्यावे.

(६) मायग्रेन, डिप्रेशन, मानसिक दौर्ब्यल्य, दूर होते, अंगावर येणारी सूज कमी होते.

(७) खोबरेल तेलात जर सब्जा बी चे चूर्ण मिसळून लावले तर, सोरायसिस, एक्जिमा, बरा होतो.

(सोशल मीडियावरुन साभार)