कारेगाव येथे दिशा फाउंडेशन आणि महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे उद्या बुधवार दि 10 जानेवारी 2024 रोजी दिशा फाउंडेशन, महारोजगार, ई-कन्सलटन्ट आणि Z 24 न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष संतोष सातकर यांनी दिली.

 

या मेळाव्यात शिरुर तालुक्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असुन इयत्ता 5 वी ते 12 वी तसेच डिग्री, डिप्लोमा झालेल्या उमेदवारांची तेथे मुलाखत घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यावेळी कार्यक्रमासाठी पुण्याचे सहकामगार आयुक्त अभय गिते, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, शिरुरचे आमदार अशोक पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, भाजपाचे शिरुर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेना युवासेनाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, कारेगावच्या सरपंच निर्मला नवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.