कारेगाव येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कारेगाव (प्रतिनिधी) कारेगाव (ता. शिरुर) येथुन एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी उंची ५ फुट, रंग गोरा, केस काळे लांब, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील वेश्या व्यवसायास भाड्याने खोली देणारा मालक अजित इटनर याच्यावर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत वेश्या व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या तीन मजली इमारतीत खोली भाड्याने देऊन जागा उपलब्ध करुन देणाऱ्या अजित देविदास इटनर या खोली मालकावर रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   कारेगाव (ता. शिरुर) येथील यश-इन चौकात अजित इटनर याची इमारत […]

अधिक वाचा..

कारेगाव येथे दिशा फाउंडेशन आणि महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे उद्या बुधवार दि 10 जानेवारी 2024 रोजी दिशा फाउंडेशन, महारोजगार, ई-कन्सलटन्ट आणि Z 24 न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष संतोष सातकर यांनी दिली.   या मेळाव्यात शिरुर तालुक्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार […]

अधिक वाचा..

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील ‘महादेव ज्वेलर्स’ नावाने ज्वेलरीचे दुकान चालविणारा सोनार प्रताप परमार याने परिसरातील ब-याचशा नागरीकांकडुन सोने गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे दागीने दुरुस्त करण्यासाठी मोडण्यासाठी तसेच नवीन सोने खरेदीसाठी पैसे घेवुन सोन्याच्या दागीन्यांचा अपहार करुन नागरिकांची फसवणुक करुन पळुन गेला होता. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस पोलीस स्टेशनला ऑक्टोबर […]

अधिक वाचा..
pmpml-shirur

Shirur पर्यंत PMPML बस सुरू; पाहा वेळापत्रक…

शिरूर (तेजस फडके) शिरुरला पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, नागरिक व विविध संस्था संघटनांच्या वतीने मागणी होत होती. अखेर, पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि शिरूरमध्ये आज (शुक्रवार) पहिली बस दाखल झाली. यावेळी अनेकांनी बसचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रांजणगाव ते शिरुरपर्यंत एस.टी. बस थांबत नसल्याने अनेकांची गैरसोय होत होती. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि 5) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण 85.27 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणुक निर्णय अधिका-यांनी सांगितले. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकुण नऊ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सरपंच पदासाठी अनुसुचित जाती […]

अधिक वाचा..
grampanchayat-karegaon

कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील अनावश्यक कचरा कारेगावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे जाळल्याने मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. पर्यावरणाला हानी पोहचत असताना कारेगाव ग्रामपंचायतच्या अजब गावकारभाऱ्यांचा गजब कारभार पुढे आला आहे. विद्यमान सरपचांनी रांजणगाव MIDC तील एका कंपनीला पञ व्यवहार करुन तुमच्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याचे म्हटले होते. दुस-याच महिन्यात […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील गणेश ताठे यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या शिक्षकाचा कारेगावमध्ये अपघाती मृत्यू

सत्तावीस वर्षे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूने गाव हळहळले शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा वाहनाला धडकून मृत्यू झाल्याची घटना काल घडलेली असताना सकाळच्या सुमारास वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाचा पुणेनगर महामार्गावर कारेगाव नजीक अपघाती मृत्यू झाला असून संजय सिताराम कदम असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव असून गावात 27 वर्षे ज्ञानदानाचे […]

अधिक वाचा..