शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी एक आमदार आणि ससूनचे डॉ अजय तावरे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तसंच शिरुर तालुक्यात चाललेला बेसुमार वाळू उपसा आणि बेकायदेशीर माती उपसा यातील वाळू माफिया आणि माती चोरांना वाचविण्यासाठी सत्ताधारी पक्षातील हवेलीतील एक बडा नेता शिरुरच्या महसूल यंत्रणेवर तसेच पोलिसांवर दबाव टाकत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.
पुण्यात आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन मुलाने दोन जणांचा बळी घेतला आरोपी असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. परंतु नंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलुन धरल्यावर मात्र त्या अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर तसेच आजोबांवर कडक कारवाई करण्यात आली. अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी एक आमदार, ससूनचे डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांनी आरोपीला वाचविण्यासाठी रक्ताचे नमुने बदलल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिरुर तालुक्यात गेल्या एक वर्षांपासुन वाळू डेपोच्या नावाखाली घोड धरणात बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु आहे. त्यात गुनाट तसेच चिंचणी परिसरातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक बेसुमार वाळू चोरी करत आहेत. तसेच घोड धरणातून शेतीच्या नावाखाली वीटभट्टीला मातीचोरी होत आहे. मात्र याबाबत शिरुर येथील महसूल विभागात कोणी तक्रार केल्यास सत्ताधारी पक्षातील हवेलीतील एक बडा नेता फोन करुन महसूलच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे एका कर्मचाऱ्याने ‘नाव’ नं छापण्याच्या अटीवर सांगितले.
महसूल व पोलिसांची बघ्याची भुमिका…?
सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहे. शिरुर तालुक्यात निमोणे, गुनाट आणि शिंदोडी येथे कोणतीही परवानगी न घेता घोड धरणातुन बेसुमार माती उपसा चालु आहे. ती माती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील अनेक चालक हे अल्पवयीन आहेत. तसेच अनेक ट्रॅक्टरची कागदपत्रचं नाहीत. तसेच हे ट्रॅक्टर चालक मोठया आवाजात गाणी लाऊन भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवतात. त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. परंतु याबाबत शिरुर येथील महसूल विभाग आणि पोलिस विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन सुद्धा त्यांनी फक्त बघ्याची भुमिका घेतली आहे.
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या