अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाय, दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल पावसामुळे कोसळले होते. शेळ्या चरत असताना विजेच्या तारांजवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यावेळी संभाजी वाळके हे शेतकरी त्यांच्या जवळ त्यांनादेखील विजेचा शॉक लागला. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु, तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शोकाकुल वातावरणात संभाजी वाळके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शेतकऱ्याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणचा निषेध व्यक्त केला आहे.
अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतात पाणी साचून शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. मात्र सततच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेळ्या व मेंढ्याचा मृत्यू…
शिरूर तालुक्यातील बेट भागात सलग तीन दिवस पाऊस…
शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…
तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…
पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…