malthan-goat

शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने शेळ्या व मेंढ्याचा मृत्यू…

क्राईम

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) : मलठण (ता. शिरूर) येथे आज (मंगळवार) सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसून सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मालक उत्तम गोडसे (रा.मलठण ) हे बचावले आहेत.

मलठण येथील गोडसे हे शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेले होते. सायकांळी सहाच्या सुमारास ते शेळ्या घरी घेऊन जात होते. यावेळी प्रवाहित वीज वाहिनीचा धक्का ९ शेळ्या व २ मेंढ्या यांना बसला. यामध्ये शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेळ्या जागीच पडल्याचे पाहिल्यानंतर गोडसे हे सावध झाले. ते पुढे गेले नाहीत, त्यामुळे ते थोडक्यात बचावले.

दरम्यान, उत्तम गोडसे यांनी ही माहिती तेथील स्थानिकांना दिली. त्यानंतर महावितरणला माहिती देऊन तेथील वीज प्रवाह खंडित करण्यात आला. या घटनेमध्ये गोडसे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यातील बेट भागात सलग तीन दिवस पाऊस…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…