‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीमुळे सात तासात ‘जॉन्सन’ सापडला; शिंदे कुटुंबियांनी मानले आभार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला होता. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आज (दि १८) रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सात तासातच ‘जॉन्सन’ सापडला. त्यामुळे बापुसाहेब शिंदे यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे आभार मानले आहेत.

 

रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला होता. त्यानंतर शिंदे यांनी सोशल मिडीयावर ‘जॉन्सन’ चा फोटो टाकुन त्याचा शोध घेण्यासाठी आवाहन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ हा शिंदे कुटुंबाच्या घरातील सदस्य झाला होता.

 

बापुसाहेब शिंदे यांचे कुटुंब एकत्र असल्यामुळे त्यांच्या घरात मातोश्री कौशल्या शिंदे, भाऊ किरण शिंदे तसेच दोन्ही भावांच्या पत्नी आणि मुले अस जवळपास नऊ लोकांचं एकत्र कुटुंब आणि त्यात ‘जॉन्सन’ हा गेल्या अडीच वर्षांपासुन कुटुंबातील दहावा सदस्य असल्यासारखा वावरत होता. परंतु ‘जॉन्सन’ अचानक बेपत्ता झाल्याने संपुर्ण कुटुंबातील व्यक्ती निराश झाल्या होत्या. परंतु सहा दिवसांनी ‘जॉन्सन’ पुन्हा कुटुंबात परत आल्याने संपुर्ण कुटुंबीय आनंदित झाले आहे.

 

आंबळे येथील उद्योजक महेश बेंद्रे यांनी आज (दि १८) रोजी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेले वृत्त वाचले. त्यानंतर त्यांनी बापुसाहेब शिंदे यांना संपर्क साधत तुमचा सायबर इन हस्की जातीचा ‘जॉन्सन’ नावाचा कुत्रा आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच तो त्यांनी रांजणगाव येथे ‘शिंदे’ यांच्याकडे सुपूर्त केला. घरातील एखादा सदस्य अचानक बेपत्ता होतो आणि परत काही दिवसांनी तो परत घरी होतो. त्यावेळी कुटुंबाला जो आनंद होतो. तोच आनंद ‘शिंदे’ कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

 

‘जॉन्सन’ या कुत्र्याचा गेले अडीच वर्षे आम्ही घरातील सदस्य असल्यासारखा सांभाळ केला आहे. परंतु अचानक तो घरातुन बेपत्ता झाल्याने आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतीत होते. परंतु शिरुर तालुक्यातील अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवर निर्भीड व निपक्ष लेखन करत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आमचा ‘जॉन्सन’ कुत्रा हरविल्याची ‘बातमी’ प्रसिद्ध केली. त्यानंतर अवघ्या सात तासातच आमच्या ‘जॉन्सन’ चा शोध लागला. त्यामुळे मी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चा खुप खुप आभारी आहे.

बापुसाहेब शिंदे

युवा जिल्हाप्रमुख 

शिवसेना (शिंदे गट) 

रांजणगाव येथुन सायबर इन हस्की जातीचा कुत्रा बेपत्ता; शोधुन देणाऱ्यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस