शिरुर; डिंग्रजवाडी येथील ITW कंपनी जवळ पार्किंग भिंत कोसळली, दोन जण ठार, तर तीन जखमी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भिमा (ता.शिरुर) येथील डिंग्रजवाडी सकाळी आठच्या सुमारास आय टी सी कंपनी जवळील पार्किंग भित वाजण्याच्या सुमारास पडल्याने भिंतिखाली दाबल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर झाल्याची प्राथमिक मिळाली असुन चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

आज (दि १९) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी कंपनीची भिंत पडल्याने कामासाठी आलेले कामगार दबले गेले. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू तर एका गंभीर जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले असून काहींची तब्येत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत ९ दुचाकी गाड्या, दोन सायकली, दोन चारचाकी गाड्या बोलेरो क्रं एम एच १२ यु एम ३७९३ व टेम्पो ट्रॅव्हलर क्रं एम एच १४ सी डबल्यू ४४४० या गाड्यांचे नुकसान झाले. या अपघातात राजीव कुमार यांचा मृत्यू झाला तर मंजित कुमार गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत.

 

सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक प्राथमिक माहितीनुसार जागा मुसुद्दिलाल इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि. यांची असून पार्किंग व रस्ता आय टी डब्ल्यू यांचा आहे. कामाच्या शोधत आलेल्या कामगारांचा भिंतीखाली दबुन मृत्यू झाल्याची प्राथमिक मिळत आहे.

 

आमदार अशोक पवार यांची तत्काळ पाहणी….

शिरुर-निघोज आमदार अशोक पवार यांना सदर अपघाताबाबत माहिती मिळाली असता. त्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. तसेच सबंधिंतावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जखमींवर तातडीने उपचार करण्यात यावा त्याचा खर्च जे कागदोपत्री मालक असतील त्यांच्याकडुन घ्यावा. तसेच पुढील धोकादायक भिंत तातडीने येण्याबाबत पोलीस वरिष्ठांशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधत सूचना दिल्या.

 

कामगारांचा भिंतिखाली कामगारांचा मृत्यू…

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही कामगार कामाच्या शोधात आले. आता अचानक सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी दोन क्षणात भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जह्मी तसेच तिघे जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली. पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार आत्माराम तळवले, पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तत्काळ भेट देत स्थळा पाहणी करत पंचनामा केला.

शिरुर तालुका डॉट कॉम च्या बातमीमुळे सात तासात जॉन्सन  सापडला; शिंदे कुटुंबियांनी मानले आभार