शिरुर तालुक्यात कृषि विभागाच्या ज्वारी प्रकल्पांमुळे ज्वारीच्या उत्पादन वाढ 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शिरुर तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारी प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून बियाणे व निविष्टा उत्पादन वाढीसाठी देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने या पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढीचे लक्ष कृषी विभाग यांनी ठेवले होते. अनेक शेतकऱ्यांना एक-दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था आहे. तिथ ज्वारी अतिशय डौलदार वाढली असुन ज्वारीची कणसे जोमदार आलेली बघुन निर्वी (ता. शिरुर) येथील संजय पवार यांना आनंद झाला आहे.

निर्वी, गुणाट, धुमाळवाडी, निमोणे तसेच मोटेवाडी परिसरात कृषी सहायक जयवंत भगत यांनी शेतकरी गटांना बियाणे वाटप करुन प्रत्येक गावात ज्वारी लागवड तंत्रज्ञानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून कार्यक्रम ही घेतले. तसेच कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील विषयतज्ञ डॉ डी बी गावडे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर या सर्वांनी प्रक्षेत्रास भेटी देऊन मार्गदर्शन केले.

मानवी जीवनात आहारातील वाढते ज्वारीचे महत्व बघता शेतकऱ्यांनी ज्वारी उत्पादन घेताना नगदी पिकाप्रमाणे व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढुन नफा वाढण्यास मदत होईल. तसेच तंत्रज्ञानाचा तंतोतंत वापर ही वाढविला गेला पाहिजे असे मत तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी व्यक्त केले. निर्वी येथील शेतकरी संजय पवार म्हणाले कि ज्वारीचा वापर आहारात वाढला गेला पाहिजे तसेच शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेताना उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्या आवाहनाला साथ दिली पाहिजे असे आवाहन केले. तसेच कृषी विभागाचे प्रत्येक आवाहन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असुन शेतकऱ्यांनी यात हिरीरीने भाग घेतला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.