शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही…

क्राईम

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे जुन्या तक्रारीचा राग मनात धरून व ‘तुम्ही आमच्याविरूद्ध केलेली केसेस माघारी घे, नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. शिवाय, मारहाण केल्याची घटना घडली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील जमीन गट नंबर १०५ मधील खाजगी रस्त्याने संभाजी दशरथ शितोळे व त्यांचे चुलते, चुलत भाऊ हे जात असताना जुन्या तक्रारीचा राग मनात धरून आमच्या खाजगी रस्त्याने जायचे नाही असे म्हणत आरोपी १) प्रशांत सुरेश रणदिवे, २) सुरेश चंदर रणदिवे, ३) अनिल उर्फ बाबु सुरेश रणदिवे यांनी संभाजी शितोळे व तानाजी शितोळे याला ऊस व दगडाने मारहाण केली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रांजनगाव सांडस गावच्या हद्दीत जमीन गट १०५ मधील रस्त्यावरून संभाजी दशरथ शितोळे व त्यांचे चुलते बाळासाहेब व चुलत भाऊ तानाजी शितोळे असे जात असताना १) प्रशांत सुरेश रणदिवे, २) सुरेश चंदर रणदिवे, ३) अनिल उर्फ बाबु सुरेश रणदिवे (सर्व रा. रांजणगाव सांडस) यांनी या रस्त्याने जायचे नाही. हा रस्ता आमचे खाजगी मालकीचा आहे असे म्हणून उसाने संभाजी शितोळे व त्यांचा चुलतभाऊ तानाजी यांना मारहाण केली आहे. तानाजी यास प्रशांत रणदिवे याने दगड फेकुण मारून ‘तुम्ही आमच्याविरूद्ध केलेली केसेस माघारी घे, नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देवून निघून गेले आहेत. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार जाधव हे करत आहे.

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…

शिरूर शहरात कत्तल केलेल्या चार गोमांस विक्री दुकानांवर पोलिसांची कारवाई…

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…