शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास शिरुर गावच्या हद्दीत हॉटेल राजनंदिनी समोर पुणे-नगर हायवे रोडवरुन राम देवराव राठोड व त्यांची आई प्रमिला देवराव राठोड हे दोघे त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रं एम एच २६ सी एम २८५७ राम राठोड चालवत असताना आई प्रमिला राठोड पाठीमागे बसलेली होती.
ते पुणे बाजुकडे जात असताना पाठीमागुन अहमदनगर बाजुकडुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने भरधाव वेगात दुचाकीला पाठीमागुन धडक देवुन अपघात केला. या अपघातात राम राठोड व त्याची आई प्रमिला राठोड हे खाली रस्त्यावर पडल्याने आई प्रमिला हिच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने तिच्या डोक्यास व डाव्या हातास गंभीर व किरकोळ दुखापती होऊन तीचा मृत्यु झाला आहे. तर मुलगा राम राठोड याला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघाताची खबर न देता व अपघातग्रस्तांना मदत न करता अज्ञात चालक निघुन गेला आहे. म्हणुन त्या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द शिरुर पोलीस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल झाली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे हे करीत आहेत.
शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?
शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक