digambar-shinde-malthan

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १३) अष्टविनायक महामार्गावर मलठण-शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिगंबर रामदास शिंदे (वय १६ रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत रामदास भिवा शिंदे (रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर हा मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्याकडे सायकल नसल्याने तो दररोज शाळेत पायी ये-जा करत होता. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी येत असताना अष्टविनायक महामार्गावर मलठण-शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ ५.१५ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी बाजूने मलठण बाजूकडे जाणाऱ्या एम एच १४ जे एल ६८९६ टेम्पोने समोरून ठोकर दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिगंबर ला उपचारासाठी शिरूर येथे दाखल करण्यात आले. परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. दिगंबर याचा उपचारादरम्यान शनिवारी (ता. १४) दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू