bcl-balrangbhumi

बालरंगभूमी क्रिकेट लीगचा ३० व ३१ मे रोजी रंगणार थरार…

शिरूर तालुका

शिरूर : क्रिकेट हा खेळ संघभावना वाढविणारा खेळ आहे. बालरंगभूमी परिषद सातत्याने लहान बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते. मात्र हे उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांकरिताही उपक्रम राबवावेत या उद्देशातून तसेच त्यांच्यातील संघटनकौशल्य वाढण्यासोबत त्यांच्या शारीरिक आरोग्यवाढीसाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दि. ३० व ३१ मे २०२५ रोजी बालरंगभूमी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

३० व ३१ मे असे दोन दिवस ऐरोली नवी मुंबई येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणाऱ्या या क्रिकेट लीगमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून रत्नागिरी, जळगाव, पुणे, नंदुरबार, सोलापूर, लातूर, पंढरपूर, परभणी, सांगली, इचलकरंजी, बृहन्मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), धुळे, कोल्हापूर, अहिल्यानगर (अहमदनगर) येथील बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांचे संघ सहभागी होणार आहेत. या सामन्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम व युट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपण होणार आहे.

पुणे जिल्हा शाखेतून सहभागी होणाऱ्या रॉयल किसान शक्ती पुणे, या संघात…
1) निलेश उत्तम इंगवले (कॅप्टन)
2) संतोष भागचंद दरेकर (व्हाईस कॅप्टन)
3) संतोष शंकर पवार (विकेटकीपर)
4) भूषण बंटरराव घोलप (बॉलर)
5) संजय सर्जेराव तांबे( ऑल राउंडर)
6) वैभव बाळासाहेब ढोकले (बॅटमॅन)
7) रामदास पवन शेळके (ऑल राऊंडर)
8) शांताराम साहेबराव पटेकर(लेग स्पिनर)
9) गणेश हरिभाऊ भोंगळे (बॅट्समन)
10) साहिल गोरक्ष पवार (ऑल राऊंडर)
11) वैभव राजेंद्र कदम (बॉलर)
12) अतुल अरुण अत्रे (बॅट्समन)
13) झाकीर पापा भाई मुलाणी (बॅट्समन)
14) सचिन रामचंद्र माळवदे (बॅट्समन)
15) शांताराम मार्तंड संघान
16) ज्ञानेश्वर थेऊरकर ( ऑल राऊंडर)

दरम्यान, जातेगाव बुद्रुक ,जातेगाव खुर्द , वाजेवाडी, करंदी आणि धानोरे या शिरूर तालुक्यातील गावातील खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू खेळणार आहेत. तरी बालप्रेक्षक व त्यांच्या पालकांनी या सामन्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या वतीने अध्यक्ष दिपाली शेळके यांनी केले आहे.

करंदी गावात बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा तर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन…

नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी नोंदवला उस्फुर्तपणे सहभाग!

बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड

शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिरूर तालुक्यातून बाल रंगभूमी परीषदेस मोठा प्रतिसाद; पाहा विद्यार्थ्यांची नावे…