कॅन्सरग्रस्त आजीकडून नात-नातजावयाने केले पाच लाख रुपये लंपास अन्…

क्राईम मुख्य बातम्या

पैशांवरून उलट दिली ठार मारण्याची धमकी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कमल दत्तू मलगुंडे (वय ६०, रा. इंदिरानगर, शिरूर पेट्रोलपंप शेजारी) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

आरोप राजु दिनकर कोळपे व शिवानी राजु कोळपे (दोघे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेअडीच वाजता शिवानी व तिचा पती राजु कोळपे आजारी आजीला भेटायला आले.आजी बेडवर विश्रांती घेत असताना घरातील कपाटातून ५ लाख रुपयांची रोकड चोरी करून दोघे निघून गेले.भेटीदरम्यान निवांत बोलणे, चहा घेणे यामागे चोरी लपवण्याचा डाव.होता

दुसऱ्या दिवशी नगरला उपचाराकरिता जाण्यापूर्वी फिर्यादींनी कपाट तपासले असता रोकड गायब असल्याचे आढळले.फिर्यादींनी नात-नातजावयास फोन करून पैसे विचारले असता “तुझ्याकडे काय पुरावा आहे? तुझे पैसे घेतले नाहीत. उलट तुझ्याकडे आमचे आठ लाख रुपये आहेत. पुन्हा पैसे मागितलेस तर ठार मारू,”अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चोरी व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथासाहेब जगताप करत आहेत.bकॅन्सरग्रस्त आजीकडून पाच लाख रुपयांची चोरी केल्याचीफिर्याद दाखल केल्याने नाती व नातजावईवर विश्वासघाताचा डाग पडला आहे. ही घटना शिरूर परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून, “आपलेपणाचा विश्वास तोडणारे हे कृत्य” असे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.