औरंगाबाद: राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी 3१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो.
३१ डिसेंबर २०२५ नंतर काय होणार
e-KYC अपूर्ण असलेल्या लाभार्थी महिलांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.
अपात्र लाभार्थी योजनेतून आपोआप वगळले जातील.
केवळ पात्र महिलांनाच आर्थिक लाभ मिळेल.
e-KYC न केल्यास हप्ता थांबणार का
होय, जर e-KYC वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील हप्ता मिळण्यास अडथळा येऊ शकतो किंवा तो पूर्णपणे थांबवला जाऊ शकतो.
अपात्र लाभार्थी वगळले जाणार का?
होय, e-KYC मुळे अपात्र महिलांची नोंद आपोआप रद्द होईल आणि पात्र भगिनींना कोणताही अडथळा न येता लाभ मिळेल.
e-KYC करण्याची सोपी पद्धत – घरबसल्या पूर्ण करा
https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
होमपेजवर e-KYC किंवा Aadhaar Linkage पर्याय निवडा.
तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक अचूक भरा.
सबमिट केल्यानंतर आधारशी लिंक मोबाईलवर OTP येईल.
OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
प्रक्रिया यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर कन्फर्मेशन मेसेज दिसेल.
लक्षात ठेवा ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे.
सरकारी नोकरी किंवा चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळेल का
नाही, खालील परिस्थितीत लाभ मिळणार नाही
कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास
निवृत्तीवेतन घेत असल्यास
चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असल्यास
आयकर भरणारा सदस्य असल्यास