Skip to content
रविवार, एप्रिल 19, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

धाराशिव जिल्हा परिषद मतमोजणी: अवघ्या ३० मिनिटांत ठाकरे गटाचं विजयी खातं

महाराष्ट्र राजकीय
फेब्रुवारी 9, 2026फेब्रुवारी 9, 2026शिरूर तालुका टीम

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली असून त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या अवघ्या ३० मिनिटांतच निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.

धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमर नाना समुद्रे यांनी ४१८ मतांनी विजय मिळवत पक्षाचं विजयी खातं उघडलं आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे.

दरम्यान, कळंब तालुक्यातील ईटकुर गटातून शिवसेनेचे उमेदवार आनंद पिंटू लंगडे विजयी झाले असून पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे.

जिल्हा परिषदेसाठी ५५ जागांवर लढत

धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत.

जिल्हा परिषद: ५५ जागा

पंचायत समिती: ११० जागा

एकूण उमेदवार: ९६७

सर्व जागांसाठी आज मतमोजणी सुरू असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर: प्रतिष्ठेची लढत

धाराशिव लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आहे.

तेर गटात तिरंगी लढत होत असून

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)

ठाकरे गट समर्थित कीर्तीमाला खटावकर

अर्चना पाटील

यांच्यात थेट सामना रंगला आहे. वरकरणी तिरंगी लढत असली तरी ही लढत भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

वाढीव मतदानाचा फटका कुणाला?

तेरमध्ये यंदा ७० टक्के मतदान झालं असून गेल्या वेळेपेक्षा मतदानात वाढ झाली आहे. वाढीव मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

जिल्हा परिषद जागा ओपन महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अर्चना पाटील यांनी अध्यक्षपदाचीही दावेदारी केली असून त्यानुसार प्रचार करण्यात आला होता. या मुद्द्यावरून काही काळ भाजप आणि शिवसेनेत राजकीय तणावही पाहायला मिळाला.

Tagged 30 minutesaccountcountingDharashivopensThackeray groupWinningZp vote

पोस्टचे नॅव्हिगेशन

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

संबंधित पोस्ट

नमो शेतकरी योजनेचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; तुमच्या खात्यात आले की नाही

सप्टेंबर 11, 2025शिरूर तालुका टीम

अहेरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळवली

डिसेंबर 9, 2025डिसेंबर 9, 2025शिरूर तालुका टीम

पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा अखेर राजीनामा 

जुलै 25, 2025जुलै 25, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती
  • नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 
  • विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव
  • महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल
  • ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

Popular Categories

  • आरोग्य (2,217)
  • इतर (151)
  • क्राईम (1,593)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (165)
  • महाराष्ट्र (4,618)
  • मुख्य बातम्या (2,040)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (949)
  • शिरूर तालुका (2,704)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती
  • नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 
  • विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव
  • महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल
  • ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!