(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर बुरुंजवाडी, गणेगाव, वाघाळे, मलठण या गावांसह परिसरातील नागिरकांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, संबंधित रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मोठा मनस्ताप होऊ लागला असून, नागरिकांनी नाराजीचा सुर उमटवला आहे.
शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू करताना सुरक्षिततेचे नियम पाळलेले दिसत नाहीत. संबंधित रस्ता मोठा वाहतूकीचा असून, कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे, मातीचे ढिगारे ठेवले आहेत. वाहन चालकांना रात्री-अपरात्री अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कोठेही रस्त्याचे काम सुरू असल्याचा अथवा कोठपर्यंत खोदल्याचा उल्लेख नसल्यामुळे नवीन वाहनचालकांना प्रवासादरम्यान त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेगाव खालसा येथील पुलाच्या कठड्यांजवळ रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करत असताना वाहनचालकांची, प्रवाशांची, नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिक रस्त्याच्या कामाचे स्वागतच करत असून चांगले काम केल्यानंतर सत्कार करू. पण, नियमांची पायमल्ली केल्यास आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिरूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुहास काटे, शिरूर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, वाघाळे गावचे माजी उपसरपंच दिलीप थोरात, चेअरमन अशोक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक दंडवते यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची माहिती मिळाल्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पंरतु, त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
(क्रमशः)
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे…
१) ठेकेदाराने कामाचा फलक लावावा
२) सुरक्षिततेचे नियम पाळावेत
३) पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अथवा रस्त्याच्या एक बाजू चालू ठेवावी
४) रस्त्यावरून धुळ उडत असल्यामुळे पाणी मारावे
५) रस्त्याच्या मधोमध असलेले मातीचे ढिगारे हटवावेत
View this post on Instagram
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? https://t.co/cOBauHL8mX @Devendra_Office @mieknathshinde @AjitPawarSpeaks @nitin_gadkari @Dwalsepatil @kolhe_amol @PawarSpeaks @supriya_sule @CMOMaharashtra @SantoshDhaybar @puneruralpolice
— shirur (@shirurtaluka) March 17, 2026
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…
शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा
View this post on Instagram