Shikrapur Police Station

शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…

क्राईम

शिरूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम सुरू असताना सहकाऱ्यानेच दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात थेट कॉम्प्रेसरचा उच्च दाबाचा पाइप घातला. हवेच्या प्रचंड दाबामुळे पोट फुगून एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या विचित्र आणि गंभीर घटनेमुळे सणसवाडी परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ रा. जिल्हा गया, बिहार) असे मृत पावलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मेहुणे संतोषकुमार किशोर यादव (वय ३२) यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सणसवाडी येथील ‘वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.’ या कंपनीमध्ये ३० जून २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास काम सुरू होते. यावेळी आरोपी बिकीकुमार सरोज याने नरेश यादव यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला. कॉम्प्रेसरमधून सुटलेल्या अतिउच्च दाबाच्या हवेमुळे नरेश यांच्या पोटात मोठ्या प्रमाणावर हवा गेली आणि त्यांची प्रकृती जागीच गंभीर झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या विचित्र घटनेमागील नेमका हेतू आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाची भूमिका काय होती किंवा त्यांचा काही निष्काळजीपणा आढळून येतो का, याबाबत सखोल तपासानंतरच चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कारंडे यांनी दिली.

कामाच्या ठिकाणी, त्यातही रात्रपाळीच्या वेळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपन्यांमधील सुरक्षा नियमांची अंमलबजावणी, कामगारांवरील देखरेख आणि पर्यवेक्षण यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तपासादरम्यान कंपनी व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार का, याकडे कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सणसवाडीची भाजी मंडई ठरतेय मृत्यूचा दुहेरी सापळा!

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे गॅसचा स्फोट; जीवितहानी नाही, घरातील सर्व साहित्य जळून खाक

सणसवाडीत कंपनी कामगारांनी लांबवले चार लाखांचे पार्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत