मुंबई: अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने मदत व बचावकार्याला वेग दिला आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच, पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने आवश्यक मदत पोहोचवावी, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.